Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाढत्या अतिक्रमणांमुळे रहदारीस अडचण निर्माण

 



.दुसरबीड सुधाकर नागरे
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीडमधून जाणारा मुंबई - नागपूर महामार्ग वाढत्या अतिक्रमणांमुळे रहदारीस अडचण निर्माण झाली होती. नाल्यादेखील बुजविण्यात आल्याने सांडपाणी सुध्दा  महामार्गावर येत असल्यामुळे रोड खराब होऊन मोठ मोठे खड्डे पडत असल्यामुळे.वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती व अतिक्रमण जास्त प्रमाणात असल्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार नव्हते त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावूनही स्वतःहून अतिक्रमण न काढण्यात आल्याने आज, २४ नोव्‍हेंबरला पोलिसांची मदत घेऊन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. सकाळपासून रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरात सव्वाशेच्या आसपास अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. उद्यासुद्धा ही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


अतिक्रमणे काढण्यात आल्याने दुतर्फा ८० फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. अतिक्रमणांमुळे बसथांब्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. महामार्गाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढल्याने रस्ता ५ ते ६ मीटरच उरला. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना व पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसथांब्यावर उभे रहावे लागत होते. रस्ता मोकळा झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे या मार्गाची देखरेख आहे. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर हद्दीतील टपरी, शेड, बांधकाम तसेच मुरूम भराव काढण्याला सकाळी सुरुवात करण्यात आली आहे.