Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान बंद, गावोगावचे अध्यक्ष बनले शोभेचे बाहुले

वैजापूर-

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी सुरू करण्यात आलेले सुरू करण्यात आलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सध्या बंद पडले आहे.त्यामुळे गावागावात निवड केलेले तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष हे शोभेचे बाहुले बनले आहे. राज्याचे गृहमंत्री स्व आर आर पाटील (आबा) यांच्या कल्पनेतून २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करण्यात आले.पुर्वी गावातील तंटे गावातच मिटविले जात असत.त्यासाठी गावातील प्रतीष्ठीत व्यक्तीच्या शब्दाला किंमत दिली जात असे.गावातील सरपंच ,पोलीस पाटील यांच्याकडे गावातील तंटे मिटत असतं.अगदी गावातील सोसायटीच्या अध्यक्षाला देखील गावातील तंटे मिटविण्याचा अधिकार असे.अर्थात ही माणसे निस्वार्थी पुणे ,निःपक्षपाती पणे न्यायनिवाडा करत.
   हीच पद्धत कायद्याच्या चौकटीत बसवून गावातील वाद गावात मिटविण्यासाठी तंटामुक्ती अभियान सुरू करण्यात आले.काही वर्षे हे अभियान चांगले सुरू होते.या अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीचे जिल्हा मुल्यमापन व जिल्हा बाह्य मुल्यमापन अशा दोन समित्याकडून मुल्यमापन दरवर्षी होत असे.त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींला लोकसंख्येच्या आधारावर दोन लाख ते दहा लाख रुपये पर्यंतची बक्षीसे देण्यात येत.त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष यांचा शासनाकडून गौरव होत असे.गावागावात तंटामुक्ती अध्यक्षाला मानाचे स्थान प्राप्त झाले होते.ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षाची निवड होत असल्याने हे प्रतीष्ठेचे पद मिळविण्यासाठी चढाओढ असायची.
   अध्यक्ष पदाबरोबरच या समितीत वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास १८ जणांचा समावेश असायचा.हे सदस्य पद मिळविण्यासाठी अनेकांची धडपड असायची.मात्र त्यानंतर समीतीत राजकारण शिरले.चांगल्या कल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला वेगळे वळण लागले.अर्थात अभियान बंद झाल्यावर देखील गावागावात राजकीय वापरासाठी अध्यक्ष पदाच्या निवडी करण्यात आल्या.मात्र त्या निवडी केवळ कागदावरच उरल्या आहेत.नव्याचे नऊ दिवस या उक्ती प्रमाणे हे अभियान ठरले आहे.भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यावर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम त्यांनी गुंडाळली.तेव्हापासून हे अभियान बंद पडले आहे.महा आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनीही या अभियानाकडे दूर्लक्ष केले.त्यामुळे चांगले अभियान बंद पडले आहे.मात्र आजही गावागावात तंटे होऊन का होईना.अध्यक्ष पदाच्या निवडी होतच हसल्या तरी ते अध्यक्ष पद केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.