वैजापूर- तालुक्यातील बल्लाळी सागज येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली. अर्जुन निवृत्ती जगताप (३९) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी अर्जुन जगताप यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे ८० हजार रुपये कर्ज होते.ते कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी २२ नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केले..ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यानी तात्काळ त्यांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी , मुलगा, मुलगी असा परिवार आहे.या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.