वैजापूर-
लसीकरणासाठी जात असतांना दोन दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या आरोग्यसेविका भारती केशव माळी ( ५१ वर्षे ) यांचे शुक्रवारी निधन झाले. आरोग्यसेविका माळी या तालुक्यातील कापुसवाडगाव येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत होत्या.
तालुक्यातील लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कापुसवाडगाव येथे लसीकरणासाठी आरोग्यसेविका भारती माळी या सहकारी आरोग्यसेवकासोबत बुधवारी दुचाकीने जात होत्या. त्यावेळी लाडगाव - कापुसवाडगाव या दरम्याने दुचाकीवर मागे बसलेल्या माळी या चक्कर येवून खाली पडल्या. सोबत असलेल्या आरोग्यसेवकाने त्यांना तत्काळ प्राथमिक केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार केल्यावर त्यांना औरंगाबादला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, बहिण व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर दरेगाव येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.