बुलडाणा
दि. 26 भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 72 वर्ष पूर्ण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी नायब तहसिलदार श्री. बंगाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.