Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपचे काही नगरसेवक सेनेच्या कळपात तसेच काही आपल्या स्वगृही परतणार.

 

प्रतिनिधी: अवधूत सावंत 

कल्याण-डोंबिवली महापालिके ची जसजशी  निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने दल बदलुंची धावपळीला सुरुवात होताना दिसत आहे.
  पूर्वाश्रमी भाजपच्या तिकीटावर निवडणूक निवडून आलेले असंख्य नगरसेवक भाजपमध्ये राहून त्यांची गळचेपी व त्यांच्या गुणांकडे दुर्लक्षीत होत असल्याने भाजपला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत तर काही स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत अथवा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वास गयाराम यांना रोखण्यासाठी दमछाक होणार आहे.

भाजपा च्या तिकिटावर  निवडून आलेले नगरसेवक महेश पाटील, डॉ.सुनिता पाटील, सायली विचारे, विशाल पावसे हे तरी सेनेच्या वाटेवर आहेत असे सूत्रांकडून समजते, तसेच विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, रणजित जोशी व आणखी तीनचार नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात परत आपल्या स्वगृही परतत आहे हे सुत्रांकडून समजत आहे.

  सध्याच्या महाराष्ट्रात भाजप च्या धोरणामुळे त्यांच्या पक्षातील अनेक जण खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. यांचा येणाऱ्या काळात भाजपला अनेक धक्के बसणार आहेत.
उदाहरणार्थ महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी धडपडची दमछाक होऊन हाती काहीच लागत नाही. सदर बाबी मुळे भाजपमध्ये आलेले परत घरी जाण्याच्या तयारीत आहेत.
तसेच उलट पक्षी इतर पक्षात नाराज असलेले कार्यकर्ते इकडून तिकडे उड्या मारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.