Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकर्यासह विनायक सरनाईक यांचे महावितरण कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन.

 


चिखली तालुक्यातील तोडलेले विद्युत कनेक्शन पुर्ववत करण्याची मागणी



प्रतिनिधी/भरत जोगदंडे
तालुक्यातील अनेक गावातील थकीत वीज बिल न भरल्याने शेतकऱयांचे कृषिपंपाचे वीज कनेक्शन कट करून विद्युत पुरवठा खंडित केल्याने आज शेतकर्यासह आक्रमक भुमिका घेत दि26/11/2021रोजी चिखली वीज वितरण कार्यालय गाठुन महावितरण कंपनी कार्यालयात पुर्व सुचना न देता तोडलेली विज कनेक्शन पुर्ववत करण्यात यावे,सक्तीची विज बिल वसुली थांबवण्यात यावी, या मागणी साठी  शेतकर्यासह विनायक सरनाईक यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे ...

चिखली तालुक्यातील 10 ते 12 गावातील शेती पंपाचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकर्याच्या शेतातील पिके सुकायला लागली आहेत वीज नसल्याने विहिरीतील पाणी पिकांना देता येत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.मागील महिण्यात झालेली अतिवृष्टिमुळे शेतकर्याचे सोयाबीन पिक हातचे गेले परंतु अद्यापर्यत शासनाकडुन खरडुन गेलेल्या व नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली नाही यातच गेल्या दोन दिवसापासुन वीज महावितरण कंपनीने चिखली तालुक्यातील वीज कनेक्शन कसलीही पुर्वसुचना न देता थकीत विज बिल वसुलीचे कारण समोर करुण सर्रास विज तोडण्याचा सपाटा लावला आहे.

यातच सोमठाणा,दिवठाणा,सवणा,यासह परीसरातील शेतकर्याचे कनेक्शन तोडण्याचा प्रकार कसलेही आदेश नसतांना महावितरण कार्यालयाकडुन होतांना दिसत असल्याने हि एक प्रकारे सक्तीचीच वसुली असल्याचे म्हणत पुर्व सुचना न देता तोडलेले विद्युत कनेक्शन जोडण्याची मागणी घेऊन चिखली महावितरण कार्यालय गाठत  शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात शेतकर्यानी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.तर जोपर्यंत वीज जोडणी केल्या जात नाही.तोपर्यंत कार्यालय सोडणार  नाही अशी भूमिका शेतकर्यासह सरनाईक यांनी घेतली आहे.यावेळी विनायक सरनाईक,बळीराम हाडे,औचितराव वाघमारे,सुंदर्शन वाघमारे,विजय मोरे,गणेश इंगळे,शालिकराम हाडे,गजानन खडके,अमोल झगरे,संदिप हाडे,राहुल वाघमारे,इश्वर झगरे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.