Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आरोग्यसेविका टाक यांचे निधन

 




वैजापूर, येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आरोग्यसेविका वैशाली टाक (वय ४५, रा. जीवनगंगा वसाहत) यांचे श्र्वासाच्या त्रासामुळे सोमवारी दुपारी निधन झाले. करोना लसीकरणाच्या मोहिमेत त्यांनी अग्रेसर राहून महत्वाची भूमिका बजावली होती. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रुग्णालयात काम करत असतांना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक भगवान सिंघल करीत आहेत.