Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाईने सामान्य माणसाचे जगणे मुश्कील- राजाराम पानगव्हाणे

प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या आदेशान्वये माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जनजागृती अभियान व सदस्य नोंदणी मोहीम सुरुवात झाली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री राजाराम पानगव्हाणे बोलत होते
     आज पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर,व इतर घरगुती वापराच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे केंद्र सरकारने सरकारी कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे आणि या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे जनतेच्या हाताला काम नाही आणि म्हणून काँग्रेस पक्ष सबंध देशभर जनजागृती अभियान राबवत आहे .
निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लासलगाव शहरातील मार्केट गेट समोर सदर अभियानाचा प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी निफाड तालुका अध्यक्ष मधुकर शेलार यांनी प्रास्ताविक केले तसेच डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विकास चांदर, संनियंत्रण समितीचे अध्यक्ष गुणवंत होळकर इफ कोच्या संचालिका साधनाताई जाधव जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यानंतर पदयात्रा काढून केंद्र सरकार विरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली व जनजागृती संदर्भात माहितीपत्रके वाटण्यात आली  तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेतले हा खऱ्या अर्थाने शेतकरी आंदोलनाचा विजय आहे आणि म्हणून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला तसेच या आंदोलनात सुमारे सातशे शेतकरी शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
     सदर कार्यक्रमासाठी साहेबराव ढोमसे प्रकाश पानसरे महेंद्र पुंड सुनील नीकाळे दिगंबर गीते नरेंद्र गीते निर्मलाताई खर्डे उपसरपंच अफजल शेख रामदास शेजवळ तांबोळी आरिफ मंसूरी मिराणपठाण आस्लमशेख जाॅन पठान सोनू शेख सतीश पवार सोनू शेजवळ सुरेश कुमावत गोपीनाथ नागरे विजय भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वरळीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन होळकर यांनी मानले.