Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा या मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर उपोषण




 वैजापूर- शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा या मागणीसाठी तालुक्यातील घायगाव येथील  शेतकरी कुंटुबियासह सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.घायगाव येथील संजय आसाराम निकम यांची घायगाव शिवारात गट नंबर १०२ व १०३ मध्ये शेती आहे.या शेतात जाण्यासाठी निकम यांना रस्ता नाही.त्यामुळे त्यांचे हाल होत आहे.तहसिलदार वैजापूर यांना त्यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरुपात मागणी केली.मात्र त्यांना रस्ता मिळाला नाही.त्यामुळे निकम यांनी तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे