चिखली : येथील व्यापारी कमलेश पोपट यांची हत्या करणारे तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कोणताही पुरावा न सोडता आरोपी फरार झाले होते आणि पोलिसांच्या समोर मोठे आव्हान देऊन ते पसार होण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबीच्या मदतीने तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी झाल्याची माहिती हाती आली आहे.
सहा महिन्या अगोदर दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या आरोपी सोबत बाचाबाची झाल्याचे राग डोक्यात असल्याने कमलेश पोपट यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचला होता आणि यामधून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. यातील एक आरोपी देऊळगाव राजा पोलिस ठाणे हद्दीतील तर दोघे अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील असल्याची चर्चा आहे. लवकरच पोलीस प्रशासन पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सविस्तर माहिती देणार असल्याचे कळत आहे. हत्या झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी या तपासकामी रात्रंदिवस काम करत होते.