Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निलेश देशमुख यांचा साहित्यिक गौरव



नांदुरा: येथील सर्वांना सुपरिचित असलेले शिक्षण, समाजकार्य, प्रबोधन इत्यादी क्षेत्रात कार्यरत राहणारे निलेश रामराव देशमुख ते उत्कृष्ट साहित्यिक सुद्धा आहेत.त्यांच्या प्रतिभासंपन्न साहित्याला नुकतेच  विविध सामाजिक मंडळ  व समूह यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 
निलेश देशमुख यांना शालेय जीवनापासूनच वाचन लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनापासून तर ते उत्तम प्रकारे साहित्य लिखाण करू लागलेत. कथा, कविता, लेख, चारोळी, ललित, निबंध अश्या अनेक साहित्य प्रकारातील त्यांचे साहित्य वेळोवेळी विविध वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून नेहमीच प्रकाशित होत आले आहे. त्याला वाचन, कलारसिकांकडून उत्तम असा प्रतिसादही लाभत असतो. त्यांचे बहुतांश साहित्य हे राष्ट्र, समाज पर्यावरण, निसर्ग, मानवता, आदी याविषयीच असते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समता, बंधुभाव, पर्यावरणाविषयी जिव्हाळा, निसर्गाबद्दल आपुलकी, संस्कृती बद्दल आदर, राष्ट्र व समाजाबद्दल आत्मीयता, महापुरुषाबद्दल अभिमान जागृत होईल अशा स्वरूपातील त्यांचे मौलिक साहित्य असते. विविध विषय आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य व मानवी मूल्यांना प्रोत्साहन देण्याचेही  कार्य ते करीत असतात. साध्या, सरळ, सोप्या, पध्दतीचे लिखाण वाचकांना आवडते व विचारमंथन करण्यास सुद्धा भाग पाडते. त्यांच्या अशाच विविधांगी प्रेरक, मार्गदर्शक साहित्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असतेच. स्थानिक पातळीवरच नव्हे तर त्यांच्या कार्याचा गौरव हा राज्यस्तरावर सुद्धा  होतांना दिसतो. निलेश देशमुख यांच्या सर्जनशील, सामाजिक, पर्यावरणस्नेही, वास्तववादी, दिशादर्शक, प्रबोधनात्मक, जागृतीपर, विरंगुळात्मक, अशा सर्व सर्व प्रकारच्या साहित्य साठी त्यांना विविध साहित्य मंडळ व समूहाच्या वतीने गौरविण्यात आले आहे. 
नीलेश देशमुख यांना नुकतेच अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई यांच्या वतीने आयोजित अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील काव्य लेखनासाठी राज्यस्तरावर "सर्वोत्कृष्ट" या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. शिवशंभु सेवाभावी संस्था, वडघूल, ता श्रीगोंदा जी अहमदनगर यांच्या वतीने उत्कृष्ट साहित्यसाठी राज्यस्तरावर "उत्तेजनार्थ" क्रमांक पटकावल्या बद्दल प्रमाणपत्र सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले आहे. काव्य का अध्यात्म मराठी प्रेरणा समूह तर्फे सुद्धा त्यांना साहित्य लेखनासाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. राजयुवा प्रतिष्ठान च्या वतीने उत्कृष्ट काव्य वाचनाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कवी सरकार वाचक मंच, इंगळी च्या वतीने अप्रतिम साहित्य रचनेसाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. शब्द सजना साहित्यिक व सांस्कृतिक मंचच्या वतीने ऑनलाइन कवी संमेलनासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. भावमेघ राज्यस्तरीय साहित्य विचार मंच च्या वतीने 'विद्यार्थी आणि शिक्षण काळाची गरज' या विषयावरील रचनेला "उत्तेजनार्थ" म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. बालकाव्य नगरी, शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने बाल दिनानिमित्त उत्कृष्ट काव्य लेखनासाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सिनेमा काव्यमंच साठी केलेल्या गीत रचनेला "उत्तेजनार्थ" म्हणून गौरविण्यात आले. माझी लेखणी साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्कृष्ट चारोळी लेखनाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे, तर छावा काव्य मंचच्या वतीने सुद्धा  सुंदर काव्यरचनेसाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. मैत्री कट्टा कविमनाचा आयोजित चित्र चारोळी स्पर्धेत राज्यस्तरावर "द्वितीय " क्रमांक तर लघुलेखन स्पर्धेत तील लेखनासाठी "तृतीय" क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.