निफाङ प्रतिनिधी
लासलगाव-येथे फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय संस्था व सर्व समाज बांधवांतर्फे २६ नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी सर्व जातीधर्माचे धर्मगुरुंच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुतळ्याजवळ भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संत साई गिरी महाराज, बौद्ध धम्माचे धम्मगुरू भनते दीपंकर, मौलाना फारुख येथे फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय संस्था व सर्व समाज बांधवांतर्फे २६ नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले या वेळी सर्व जाती धर्माचे धर्मगुरुंच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला.या वेळी संत साई गिरी महाराज, बौद्ध धम्माचे धम्मगुरू भनते दीपंकर, मौलाना फारुख
शेख, फादर प्रकाश खाजेकर, शेख, फादर प्रकाश खाजेकरसदा में जीत सिंग यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे पुजन लासलगांवग्रामपालिकेचे सरपंच जयदत्त होळकर, जि.प.सदस्य डी. के. जगताप, शिवा सुराशे, प्रकाश पाटील, प्रकाश दायमा व गुणवंत होळकर, उपसरपंच अफजल शेख यांचे हस्ते करण्यात आले तसेच उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेतर्फेसर्व धर्मगुरुंना शाल, गुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी संविधान उद्देशिकेचे सामाईक वाचन करणेत आले.अँड. माधुरी खाजेकर यांनी भारतीय संविधान विषय माहिती दिली.संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, दुय्यम निबंधक अभिजीत देशपांडे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, रामनाथ शेजवळ, अमोल थोरे, दत्ता पाटील,मधुकर गावडे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष पिंटु शिलकलकर, राजेंद्र जाधव, चंद्रकांत शेजवळ,राजेंद्र चाफेकर, सुधाकरअविनाश पगारे, प्रा. जालिंदर बगाडे, प्रा . शाम साळवे, सूरज झाल्टे, लासलगांव, वेळापुर, विंचूर, कोटमगांव येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित
होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश संसारे,अशोक गायकवाड, मनोज शेजवळ, नानासाहेब बनसोडे,
अमोल संसारे , डॉ. अमोल शेजवळ, नाना सुर्यवंशी, विलास खैरनार, रमेश कर्डक, सोनु शेजवळ, मिरान पठाण, सनी पाठक आदींनी प्रयत्न केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालनमनोज शेजवळ व आभार प्रदर्शन अमोल संसारे यांनी केले वकार्यक्रमाची सांगता २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली वाहून राष्ट्रगीताने करण्यात आली.