अन्यथा उग्र आदोंलन छेडण्यात येईल - प्रकाश पाटील शिवसेना तालुका प्रमुख
लासलगांव -प्रतिनिधी महेश साळुंके
महावितरण उपविभागीय कार्यालय अंतर्गत शेतकन्यांच्या कृषी पंपांची अण्यायकारक वीज तोडणी त्वरीत थांबवण्यात यावी सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थीती ही कोरोना महामारीमुळे अत्यंत हालाकीची ( बिकट ) आहे . तसेच सतत होणान्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . त्यामुळे शेतकरी बांधवांना जीवन जगणे कठीण झाले आहे . त्यात आपण अन्यायकारक परिसरातील संपूर्ण रोहीत्र ( डी.पी ) अनाधीकृतरित्या बंद करून शेतकरी बांधवांचा रब्बी पिकांचा हंगाम चालु असल्याणे कृषीपंपांची विजतोडुन आपण मोठ्या प्रकारचा अन्याय व अत्याचार करीत आहात . वीज मंडल नियमक आयोगाच्या नियमांचे सरासपणे आपण उल्लंघन करीत आहात तरी लासलगाव उप विभागात सर्रास पणे चुकीच्या पध्दतीने रोहीत्र ( डी.पी ) वीज पुरवठा तोडणे त्वरीत थांबवावे अन्यथा शेतकरी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारामुळे होणाऱ्या आंदोलणास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी दीला आहे
यावेळी लासलगाव महावितरण उपविभागीय कार्यालयात पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक होत उपविभागीय अभियंता नागरे यांचे दालनात दोन तास ठीय्या आंदोलन केले अखेर कृषी मंत्री ना .दादाभाऊ भुसे यांनी दुरध्वनी द्वारे उप विभागीय अभियंता यांना शेतकऱ्यांशी सामंजस्याची भुमिका घेवुन योग्य तोङगा काढण्याच्या सुचना दील्या या वेळी शिवसेना नेते सुनिल आब्बड,निवृत्ती जगताप,बाळासाहेब जगताप, बाळासाहेब शिरसाठ सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते