Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपजिल्हा रुग्णालय रोडवरील बराच वेळ आगीचा थरार ...

 महावितरण च्या कर्मचाऱ्यांच्या समय सुचकते मुळे मोठा अनर्थ टळला



मलकापूर : मलकापूर शहरातील राजपाल ट्रेडिंग च्या समोर, मालवाहू ट्रकाच्या वरच्या बाजूस महावितरणच्या वीजेचे तार अडकून ओढल्या गेल्यामुळे विद्युत डीपीवर शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना रात्री 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून समय सूचकता व  तत्काळ निर्णय घेत विद्युत प्रवाह बंद केल्यामुळे  मोठा अनर्थ टळला.

         याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीस बिघा परिसरातील उपजिल्हा रुग्णालय परिस्थितीत राजपाल ट्रेडिंग समोरून ट्रक क्रमांक युपी 70 CT 8445 चा मालवाहू वाहन मालं खाली करून परतत असताना महावितरणच्या सर्विस लाईन च्या वीजेचे तार ट्रकाच्या वरच्या बाजूस अडकून ओढले गेल्याने तारा तुटून पडल्या व त्यामुळे जवळच असणाऱ्या डीपीवर मोठा शॉर्टसर्किट होऊन आग लागली.  डीपी जवळच असलेले छोटे दुकान सुद्धा या आगीत जळून खाक झाले. या दरम्यान जवळच एका दुकानात खरेदी करत असलेले महावितरणचे कर्मचारी आशिष खापरे  यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित माहिती दिली व तातडीने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. व तात्काळ महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आली.  यावेळी नगरसेवक अनिल गांधी यांनी अग्निशामक दलाशी संपर्क करून तत्काळ घटनास्थळी बोलाविले. तसेच परिसरातील नागरिक व महावितरणचे कर्मचारी यांच्या सहाय्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
          यासंदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता विशाल गायकवाड यांनी सदर घटनेत महावितरण च्या सर्विस लाईन तुटल्याने महावितरणचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरून शहर पोलीस स्टेशन मलकापूर यांनी  एन्सी क्रमांक 21 कलम 427 भा द वि नुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.