Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेंदुर्णीत पथनाट्याद्वारे नागरिकांची कायद्याच्या बद्दल जनजागृती.

 

   शेंदुर्णी ता.जामनेर

जामनेर तालुका विधी सेवा समिती जामनेर व जामनेर तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.२७ आक्टोंबर रोजी पथनाट्याद्वारे नागरिकांना कायद्याची माहिती ,त्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, लोकन्यायालयाचे महत्त्व तसेच विविध कायद्यांची माहिती या द्वारे देऊन समाजप्रबोधन करण्यात आले .

   स्टेट बँक शाखा शेंदुर्णी जवळ आयोजित या कार्यक्रमात गलवाडा ता.सोयगांव येथील हरहुन्नरी कलावंत यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत पथनाट्याद्वारे कायद्याचे महत्त्व, नागरिकांना कोर्टाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा आदींची माहिती दिली.

    या कार्यक्रमात  पोउनि.दिपक मोहिते यांनी यावेळी कायद्यात रहाल तर सदैव फायद्यातच रहाल असे सांगुन नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य  करण्याचे आवाहन केले.                 यावेळी जामनेर वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर राजपुत, माजी उपसरपंच व सहकार, राजकीय क्षेत्रातील नेते गोविंद अग्रवाल, पं.दिनदयालजी पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे,शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोउनि.दिपक मोहिते, स्विकृत नगरसेवक अँड. धर्मराज सुर्यवंशी  तसेच जामनेर व सोयगांव तालुक्यातील वकील बांधव,पत्रकार,नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर यांनी तर आभार अँड. राहुल बावसकर यांनी मानले.