सोलापूर जिल्हा प्रतिनिधी / चंदू खिलारे
सोलापुर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना सन २०२१~२२ चा निधी २९.८५ कोटी चुकीच्या पध्दतीने वाटप केल्याची तक्रार काॅग्रेस च्या स्थापत्य समिती सभापती तथा नगरसेविका अनुराधा काटकर नगरसेवक प्रविण निकाळजे तसेच शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी पालकमंत्र्यांनी निधी वाटपाबाबत तक्रार करूनदेखील कोणतीच कार्यवाही केली नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांकडे सोलापुर दौर्यावर असताना केली असुन तक्रारीमध्ये सोलापुर महानगरपालिका सर्वसाधारण सभा दि.१८/०६/२०२१ मधील विषय क्र.४२ ठराव क्र.६२ असा ठराव अनाधिकृत पध्दतीने सत्ताधारी भाजपाने गटनेत्यांना विश्वासात घेऊन नंतर विश्वासघात करत १०२ नगरसेवकांमधील अनूसुचित प्रर्वगातुन निवडुन आलेल्या नगरसेवकांना* देण्याऐवजी सत्ताधारी भाजप यांच्याकडुन चुकीच्या पध्दतीने रक्कमेची फोड करून यामध्ये *महापौर,उपमहापौर,सभागृहनेता,वि रोधीपक्ष नेता,आमदार,खासदार यांना प्रत्येकी १.५० कोटी ते २ कोटी* पर्यंत निधी फोड करून सदस्य सुचवतील तेथील कामे अश्या पध्दतीचा ठराव पास करण्यात आला असुन यामध्ये अनूसुचित जाती प्रर्वगातुन निवडुन आलेल्या नगरसेवकांना मात्र ४० लाख आणि इतर नगरसेवकांना प्रत्येकी २० लाख असा चुकीच्या पध्दतीचा ठराव करून शासनाने हा निधी दलित वस्त्यांमधील विकास करण्यासाठी ही योजना असुन योजनेचे निकष व नियम यांना पायदळी तुडवत सुर्वण भागातील एका दलित नागरिकाचे नाव टाकुन दलित वस्ती नसलेल्या भागात हा निधी वळवण्याचे काम होत असुन यांची तक्रार या आधी जिल्हयांचे पालकमंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे केली होती या तक्रारीला १ महिना उलटून देखील अदयापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हद्दवाढ भागातील दलित वस्त्यांमधील विकास कामे निधी अभावी थांबली असुन पालकमंत्री महाविकास आघाडीतील नगरसेवकांचे म्हणणे ऐकुन घेत नसुन अधिकार्यांवर जबाबदारी टाकत असुन या प्रकरणांचा निर्णय फक्त पालकमंत्रीच घेऊ शकतात परंतु पालकमंत्री टाळाटाळ करत असुन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची तक्रार स्थापत्य समिती सभापती तथा काॅग्रेस नगरसेविका अनुराधा काटकर,काॅग्रेस नगरसेवक प्रविण निकाळजे,शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल,श्रीधर काटकर,शंकर आयवळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोलापुर दौर्यावर असताना केली आहे.