Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोंडाईचा शहर नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे



हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाला यांच्या जयंतीचे औचित्य साधत "दोंडाईचा शहर नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व उत्कृष्ट कामाची दखल घेत समाजातील जेष्ठ मंडळीनी  चि. समाधान ठाकरे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी दिनेश बोरसे आणि सचिव पदी गणेश पवार यांची निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्थरावरून कौतुक अभिनंदन करण्यात येत आहे...

याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष समाधान ठाकरे यांनी सांगितले की, युवक मंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा माझ्यावर समाजाच्या वरिष्ठांनी टाकली आहे. ती चोक पणे पार पाडले तसेच तरुणांना एकजूट करून वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन करण्याचा प्रयत्न करणार असेल्याचे बोलून दाखवले.