प्राप्त रक्कम मिरा भाईंदर क्षेत्रातील कोविडमूळे निराधार झालेल्या मुलांच्या
शिक्षणासाठी वापरण्याचा मा.आयुक्त यांचा निर्णय
मिरा भाईंदर शहरात कोराना आटोक्यात रहावा करिता स्थानिक प्रशासन व शासन यांचे मध्ये समन्वय राखण्यात आला. महानगरपालिका अधिकारी, सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष यांचेबरोबर बैठक घेवून सामूहिक निर्णय घेतले. प्रभाग स्तरावर प्रभाग अधिकारी यांना प्रभाग समित्यांच्या सदस्यांची प्रत्येक महिन्यात विशेष बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर प्रतिदिन सायंकाळी ५.३० वाजता सर्व प्रभाग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात येत होती. प्रत्येक प्रभाग स्तरावर कोरोना दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. गर्दी नियंत्रण होण्याकरिता नागरीकांना अत्यावश्यक बाबीच्या खरेदी करिता रस्त्यावर न येता नागरीकांना घर बसल्या सेवा/सुविधा देण्यासाठी ॲप तयार केले. व्यापारी संघटना व इतर विक्रेता संघटना यांचे प्रतिनिधीसोबत बैठका घेवून कोरोना नियमांचे पालन करुन नागरीकांसाठी त्यांच्या संकुलात माल विक्री करण्यास परवानग्या दिल्या. त्यामुळे रस्त्यावरील नाहक वाढणारी गर्दी कमी झाली. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महानगरपालिका व स्थानिक पोलीस प्रशासन यांचा समन्वय साधून नागरीकांकडून दंड रुपाने रु. ८६,१६,९०२/- इतका दंड वसुल करण्यात आला. कोरोना रोगीचे प्राथमिक स्तरावर निदान होणे करिता गर्दीच्या ठिकाणी तसेच सर्व विक्रेते, सोसायटीच्या ठिकाणी विशेष कोरोना तपासणीच कॅम्पचे आयोजन करून पुर्वी जेथे १०००-१२०० होणारी RT-PCR टेस्टिंग प्रतिदिन ४५००-५००० इतकी पोहचली. आयुक्त दिलीप ढोले यांनी महानगरपालिका RTPCR लॅब मधील RTPCR निदान करण्याच्या मशिनची संख्या वाढविल्याने कोरोना चाचणी केल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याचा अहवाल नागरिकांना प्राप्त होऊ लागला.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महत्वाची बाब म्हणजे महापालिकेने पालिकेचे हॉल/समाज मंदिर मध्ये ICU बेडची तयारी केली. खाजगी रुग्णालयांशी समन्वय साधून त्यांना कोरोना रुग्णालयाचा परवाना देवून ICU बेड्सची संख्या वाढविण्यास सहकार्य केले. आयुक्त यांनी पदभार स्विकारल्यानंतर ICU व O2 बेड्सची संख्या २५० नी वाढविण्यात आली. शासनस्तरावर सतत पाठपुरावा करुन शहरात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची दक्षता आयुक्त यांनी वेळोवेळी घेतली. प्रसंगी ऑक्सीजन टँकर वेळेत पोचावे करिता पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून विशेष कॉरिडोर तयार केले. शहरात ऑक्सीजनचा तुटवडा पडून कोणताही अनर्थ घडला नाही. काही प्रंसगी जेथे खाजगी रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा पडत होता, त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेले सिलेंडर तातडीची बाब म्हणून त्यांना उपलब्ध करुन दिले. महाराष्ट्र शासन निर्देशानुसार ३ पट साठा क्षमता म्हणजेच ११३.७९ MT उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यांनी वारंवार बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत १५५.६२ MT इतका साठा क्षमता उपलब्ध करण्यात आलेला आहे, म्हणजेच ४१.८३ MT इतका जादा क्षमता मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे.
कोरोनाची लक्षणे नसलेले परंतु कोरोना निदान झालेल्या रुग्णांना शासन निर्णयानुसार त्यांची घरी उपचार घेण्यात महानगरपालकेतर्फे परवानगी देण्यात आली. अशा रुग्णांना वैदयकिय अधिकाऱ्यामार्फत कोरोना किट देण्यात आले तसेच त्याची नियमित माहिती घेण्यासाठी रुग्णांच्या घरी कोव्हीड कॉल सेंटर मार्फत दररोज फोन करुन संपर्क करण्यात येत होता. कोरोना उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची देखिल प्रकृतीची विचारणा करण्यासाठी कॉल सेंटरद्वारे संपर्क करण्यात आले. कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळेत व पौष्टीक आहार उपलब्ध करुन दिला. तसेच रुग्णांच्या मनातून कोरोनाची भीती घालवण्याकरीता व रुग्णांचे मन प्रफुल्लित राहावे याकरिता आयुक्त यांनी एक उत्तम उपक्रम राबवत कोरोना रुग्णालयात तसेच कोव्हिड केअर सेंटर या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ सुगम संगीत, भजन ऐकण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.
कोरोना सोबतच शहराचा विकास हे देखिल आयुक्त यांचे प्रमुख उद्दिष्ठ होते. शहराची धरोहर जपण्यासाठी सांस्कृतिक वास्तू, कला दालन याची उभारणी, सीसी रस्ते व इतर प्रलंबित राहीलेली विकास कामांना चालना दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घनकचरा प्रकल्प, सेवरेज ट्रिटमेंट प्लांटचे काम पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू न देणे तसेच शहराचा विकास होणे या दोन्ही बाबी एकाच वेळी सुरु राहतील याकरिता आयुक्त यांनी आवश्यक ते प्रयत्न करीत नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांच्या समस्या जाणून घेणे व कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्य तत्परता जागृत राहावी, याकरीता Walk with Commissioner ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. शहरातील अनधिकृत बांधकामावर आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
सद्यस्थिती मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही २०० इतकी असून रिकव्हरी रेट ९७.०८% इतका आहे. तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार दैनंदिन नियोजन केले जात असून दुस-या लसीचा कालावधी आलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकऱण केंद्रांमध्ये वाढ करून जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सद्यस्थितीत एकूण ७२% नागरिकांनी लसीचा पहिला डोस व ६६% नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन संरक्षित करण्यात आले.
कोरोना काळात कर्तव्यदक्ष राहून कोरोनावर नियंत्रण, ICU व O2 ची क्षमता वाढविणे, रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता न राखणे, शहराचा विकास होण्याकरीता वेगवेगळ्या नियोजनाची अंबलबजावणी करणे. या सर्व प्रकारच्या केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे माननीय महासभेत माननीय आयुक्त यांना सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरीमुळे दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी मा. महामहीम राज्यपाल श्री. भगत सिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांचा सन्मान करण्यात आला. सदर प्राप्त रक्कम मिरा भाईंदर क्षेत्रातील कोविडमूळे निराधार झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा मा. आयुक्त यांनी निर्णय घेतलेला आहे.