पेठ - मनोज जाधव
रोजी पेठ येथे श्री ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथे युवा पिढीमध्ये व्यसनाचा वाढता प्रादुर्भाव बघून तंबाखू मुक्त क्षेत्र ठेवण्याचा संकल्प केला .यावेळी विध्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक साळोक सर यांनी मार्गदर्शन केले .
वाघ सर यांनी सूत्रसंचालन करत असताना विध्यार्थ्यांना व्यसनापासून कसे दूर राहावे हे सांगितले . व्यसनापासून आपल्या प्रकृतीवर कशाप्रकारे परिणाम होतो हे सांगीतले उपस्थित हिवरकर सर ,झालटे सर , गिरी सर , भाकडे सर , इत्यादि शिक्षक वर्ग उपस्थित होते , विद्यालयाचा परीसर व्यसनमुक्त राहावा , व आवारातील पाल्य व बाहेरील कोणताही व्यक्ती असल्यास धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली . जेणेकरून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील, हा मोलाचा संकल्प करण्यात आला