उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )
पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यावरणाची हानी टाळावी या दृष्टीकोणातून उरण मधील आधार सेवाभावी संस्थे तर्फे 'वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी' हे अभियान संस्थे मार्फत राबविले जात आहे. संस्थेच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांना वृक्षाचे रोपटे देण्यात येत आहे.व वृक्षांचे संवर्धन, जतन करण्यात यावे अशी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी संस्थेच्या संचालिका अश्विनी निलेश धोत्रे व संस्थेचे पदाधिकारी ईशानी शिंदे, आवृत्ती पालकर, अर्चना समेळ, अर्चना चोरगे, संगीता ढेरे, संयुक्ता ठाकूर, शर्मिला धाकड आदी संस्थेचे पदाधिकारी यांनी घरोघरी फिरून, वृक्षाचे रोपटे देऊन जनजागृती केली. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची संस्थेच्या पदाधिका-यांनी भेट घेऊन संस्थे विषयी व अभियाना विषयी त्यांना माहिती दिली.आंबा पेरू, सिताफळ, जाम, चिकू, फणस, आवळा, तुळस, जास्वंद आदी वृक्षांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले.