रायपूर प्रतिनिधी
रायपूर बुलढाणा रस्त्याची दुरावस्था संबंधितांनी लक्ष देण्याची गरज.
बुलढाणा तालुक्यातील पांगरी गावाजवळ अतिवृष्टी मुळे नदीचे पूल वाहून गेले आहेत. व रायपूर येथून जिल्हा मुख्यालयला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. नागरिकांना जाण्यासाठी तात्पुरते पर्यायी कच्चे पूल नदीच्या शेजारी बांधण्यात आले आहे. व साध्या नागरिक त्या पर्यायी पुलाचा वापर करीत आहे. आज रोजी त्यावर बुलढाणा कडून येणारा भारत गॅस चा सिलेंडर भरलेला ट्रक क्रमांक एम एच 18 बी जी 5375 बुलढाणा वरून रायपूर कडे येताना या पुला वरून घसरून पलटी झाला आहे. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सध्या या मार्गावर एसटीची वाहतूक ठप्प आहे. व यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे यासाठी रायपूर ते बुलढाणा रस्त्याचे पूल व रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे व नागरिकांची खुपच दमछाक होत आहे करिता संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.