बुलडाणाप्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवीण्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत. यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन 29 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.प्रमोद जाधव मेहकर, राजेश डिडोळकर, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचे हस्ते मैदानाचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले. निवड प्रक्रीयेकरीता जिल्ह्यातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मोठ्या संख्येने मुले व मुलींनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणी प्रक्रीयेमध्ये खेळाडू मुलांकरीता 1600 मि. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची या चार बाबींचा तर मुलींकरीता 800 मी. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची या चार बाबींचा समावेश होता. याप्रसंगी सायकलींग या खेळाची राष्ट्रीय खेळाडू कु.गुंजन जतकर यांचे हस्ते क्लॅपर देऊन मुलींच्या 800 मी. चाचणीला सुरुवात करण्यात आली. संचलन अनिल इंगळे यांनी केले.याप्रसंगी डी.डी.लोढे, वसंत राठोड, सौ.मंजुषा जाधव, राजु पडघान, मोहम्मद सुफीयान, सारा पवार, दिक्षा हिवाळे, किरण तायडे, दिपक जाधव, वैभव काळवाघे, समाधान टेकाळे, सौ. वैशाली हिंगे, हर्षल काळवाघे, विराज तोटे, संकेत इंगळे, गजानन नागवे, यश बट्टू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी बी.आर.जाधव क्रीडा अधिकारी, आर.आर.धारपवार, महेश खर्डेकर राज्य क्रीडा मार्गदर्शक, विजय बोदडे, सौ.मनिषा ढोके, सुरेशचंद्र मोरे व्यवस्थापक, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, भिमराव पवार यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.