Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपचे वैजापुरात ' ढोल बजाओ ' आंदोलन



 भारती कदम
गोदावरी नदीवरील रखडलेल्या पुलाचे बांधकाम व नागमठाण ते काटेपिंपळगाव रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या महालगाव (ता. वैजापूर) सर्कलतर्फे भगुर फाटा येथे बुधवारी ' ढोल बजाओ ' आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. भाजपाच्या प्रदेश कार्यकारणिचे सदस्य एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, महालगाव सर्कलप्रभारी सतीश शिंदे, नितिन जोशी, बाबासाहेब डांगे यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी केले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण उघडे यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य सैनिकालाही रस्त्यावर उभे राहुन आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर यासारखी तालुक्याची शोकांतिका नाही असे मत यावेळी तालुकाध्यक्ष दांगोडे यांनी व्यक्त केले. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल वाणी, चांगदेव उघडे, बुथ संयोजक संतोष मिसाळ, कडुभाऊ कुरकुटे, अनंता बेळे,महेंद्र बोधक, दादासाहेब मोईन दिलीप दुशिंग, नारायण मुर्तडक, अशोक आहेर,दिगंबर शेळके,अशोक टेमकर,संतोष गायकवाड,सचिन साळुंखे, सरपंच दादाभाऊ मोईन,दिलीप सवई, नंदु गायकवाड,उत्तम पवार, रामकिसन विराळे,नानासाहेब वाघचौरे, सुभाष मोकाटे,गोरख राशिनकर सह सर्कल मधील बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते हजर होते.