Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात छत्रपती उदयनराजेंनी केली अजितदादांच्या वर टीका

 


 अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि 

नुकतीच महाराष्ट्र सरकारनचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्याचे नातेवाईकांकडे प्राप्तीकर विभागाने वेगवेगळय़ा ठीकाणी धाडी टाकल्या या संदर्भोंत बोलताना जे पेराल तेच उगवेल असा उपरोधक टोला छत्रपती उदयनराजेंनी भोसलेनी मारला.कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शननास आलेल्या सातारा छत्रपतीच्यां गादीचे अधीपती श्री छत्रपती उदयनराजें भोसले ह्यानी सकाळी करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
        नंतर ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे कुलगुरु डॉक्टर दिपक शिर्के ह्याचेशी चर्चा केली ह्यावेळी डी.डी. बनकर,अमित कुलकर्णी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथील सातारा जिल्हातील संलग्न कांहीं विषयावर चर्चा केली. तसेंच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे सातारा येथे उपकेंद्र ह्या महत्वपुर्ण विषयावर चर्चा केली.ह्या नंतर त्यानी माध्यमाशि संवाद साधला
         शेतकरी आदोंलना बाबत विचारले असता त्यांनी जे जे देश प्रगत झाले त्या देश्यानी शेतकऱयांना प्रतिष्टा मिळऊन दीली आहे. राज्यामधील शेतकऱयांचे प्रश्न तसेच राहीले आहेत .राज्यामधील राजकारण्याना, शेतकऱयांना मदत करणेची सुबुद्धी देणेची मागणि करवीर निवासनी अंबाबाईस केलेचे सांगितले.
        मराठा आरक्षणा बध्दल विचारले असता मराठा आरक्षणाची मशिल ही चुकीचा हातात आसल्याचे सांगितले. जातनिहाय जन गणना करुण लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचे अवाहन केले.निवडणुक आल्या की राजकारण्यांना शेतकऱयांची आठवण येते. बेंबीच्या देठापासून शेतकऱयांच्या न्याय हक्कांची भाषा बोलली जाते.नंतर मात्र सोयिस्करपणे विसर पडतो. दोषी असणारा कोणिही असो त्यचेवर कार्यवाही झाली पाहीजे. बंद करून प्रश्न कधी सुटत नाहीत. राजकारण्यांनी मतभेदांचा पलिकडे जाऊन प्रश्न सोडविणेचा विचार करण्याची मागणी केली.