कोकणातून नाशिक, जळगाव बुलढाणा,नांदुरा,शेगांव,अकोला,
आगामी दिवाळी पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वे गाडीच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ३० ऑक्टोबर रोजी या रेल्वे गाड्या सुटणार असुन शेगांव थांबा असल्याने अकोला ते रत्नागिरी जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे
०१२३९ नागपूर रेल्वे स्थानकावरून १५.५० वा सुटेल व दुसर्या दिवशी करमाळी येथे १४.१५ पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता ०१२४० ही विशेष गाडी ३१ ऑक्टोबर रोजी करमाळी स्थानकावरून २०.४० वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वा नागपूर येथे पोहोचेल
या रेल्वे सेवेला वर्धा,बडनेरा जं,अकोला जं,शेगांव,भुसावळ जं,नाशिक रोड,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापुर रोड,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग नगरी,कुडाळ रोड,सावंतवाडी रोड,थिवीम स्थानकावर थांबणार आहे सदर ०१२३९/०१२४० नागपूर करमाळी नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वे व्दितीय वर्ग,तृतीय वर्ग वातानुकूलित वर्ग,शयनयान वर्ग, व्दितीय वर्ग (सेकंड सिटींग)पुर्णपणे आरक्षित धावणार आहे
या रेल्वे सेवेला कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व दापोली शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर यांच्याकडे करण्यात आली होती
तरी लवकरात लवकर कायमस्वरूपी सुरू करावी अशी कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई गृपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले व पेण तालुकाध्यक्ष हर्षद भगत,कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,पेण प्रवासीवर्ग,कृषी अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी,विद्यार्थिनी,कामगार व नोकर वर्ग, पेण,चाळीसगाव,पाचोरा,मुर्तीजापु र,अमरावती थांब्याची वारंवार पत्राद्वारे मागणी करण्यात येत आहे