सरपंचांनी दारू पकडून दिली म्हणून थेट भानखेड गावच्या सरपंचवर हल्ला करण्याचा झाला प्रयत्न
दिनांक 22/10/2021रोजी भानखेड येथील सरपंच नितेश पंडित देवकर यांनी भानखेड गावच्या मुख्य रस्त्यावर सकाळी 10:00 वाजता MH12DL3186 या वाहनाने देशी दारूच्या 200 बाटल्या दोन व्यक्ती सह पकडून पि एस आय श्री चौहान यांच्या स्वाधीन केल्या त्यावेळी पकडलेली दारू ही भानखेड येथील अवैध दारू विक्रेता रवि बबन अवसरमोल याच्या घरी विक्री साठी नेत असल्याची कबुली वाहनासह पकडलेल्या दोन व्यक्तींनी गावकऱ्यांना व तसेच पोलिसांना दिली.
या पकडलेल्या दारू बाबतच्या घटनेचा सूड घ्यावा या उद्देशाने रवि बबन अवसरमोल याने भानखेड गावचे सरपंच यांच्या राहत्या घरी 25 ऑक्टोबर रोजी रात्री 7.30 वाजेच्या दरम्यान दारू पिऊन हल्ला करण्याचा उद्देशाने,शिवीगाळ करीत पोहोचला .त्यावेळी सरपंचांनी त्यास "गावात अवैध दारू विक्री करू देणार नाही अशी सक्त ताकीद दिली".
अश्या वेळी अवैध दारू विक्रेता रवि बबन अवसरमोल दारू पिऊन सरपंचाच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करीत,"जर मला दारू विक्री करू नाही दिली तर तुमचा मर्डर करील"अशी धमकी देत धक्काबुक्की करून निघून गेला.व संपूर्ण गावकऱ्यांना अश्लीस शिवीगाळ केला.
अश्यावेळी भानखेड येथील 500 ते 600 संतप्त नागरिक जमा झाले अश्या वेळी सरपंचांनी सदरील घटना पि एस आय श्री चौहान साहेब यांना कळवली त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व गावकऱ्यांचा आक्रोश लक्ष्यात घेत अवैध दारू विक्रेता रवि बबन अवसरमोल यास पोलीस बंदोबस्तात चिखली पोलीस स्टेशनला रात्री 9 वाजता नेण्यात आले
"गावातील अवैध दारू विक्रेता जर गावच्या सरपंचावर असा हल्ला चढवू शकतो या गोष्टीचा निषेध म्हणून शेकडो महिला व पुरुष अर्ध्या रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हजर होते".
भानखेड या गावात मागील तीन ते चार वर्षांपासून अवैध दारूच्या धंद्याने ग्रासले असून गावातील 20-25 तरुण युवक हे फक्त दारूच्या व्यसना पायी मरण पावले आहे
*भानखेड हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्याग्रस्त गाव असून* दारू बंदी बाबत महिलांनी पोलीस स्टेशन चिखली येथे निवेदने देऊनही कुठलाही फायदा झालेला नाही
उलट ज्या महिलांनी निवेदन दिले,"त्या महिलांच्या घरी जाऊन ,शिव्या देऊन त्यांना मारहाण करण्याची तसेच अॅट्रॉसिटी करण्याची धमकी देऊन पोलिसच काय कोणीही आले तरी मी दारूचा धंदा करील "मी हप्ते देतो"असे बोलून, रवि बबन अवसरमोल दारूचा खुल्ला व्यवसाय करीत होता.
भानखेड या गावात तरुणांचे दारू सेवनाचे प्रमाण वाढत असून, गावातील महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होत असल्याच्या तक्रारी गावातील महिला या जनतेतील सरपंच यांच्याकडे तक्रारी करीत होत्या यावर तोडगा काढण्यासाठी सरपंचाने त्यांना नोटीस काढून दारू न विकण्याचा सल्ला दिला व या बाबत सविस्तर माहिती पोलीस स्टेशनला मागील वर्षी कळवण्यात आलेली होती.तरी याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
अश्या वेळी गावचे सरपंच येत्या काही दिवसात दारू बंदी साठी काय काय प्रयत्न करतात हे बघणे विशेष.