वैजापूर- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिऊर ग्रामपंचायतीकडे १५ व्या वित्त आयोगाचा निधी असूनही विकासकामे होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
ग्रामपंचायतला १५ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध झाला असून हा निधी खर्च करावा.अशी सदस्यांची मागणी आहे. परंतु सरपंच व ग्रामसेवक मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. त्यांना गावच्या विकासाबद्दल अनास्था असून शिऊर गावात नाली, रस्ते, लाईट याबाबत नियोजन करून विकास कामे करण्यात यावे अशी सदस्यांची भूमिका आहे.गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून विकासकामे सुरू करावे अशी मागणी सदस्यांनी केली.
सदस्य बाळा जाधव, सुनील खांडगौरे, विजय झिंजुर्डे, बाळू पवार, अकबर शेख, लड्डू शेख, शुभम सोनवणे, अर्षद शेख, रामेश्वर निकम, आसिफ पठाण, समीर पठाण, दीपक जाधव आदीसह गावकरी यावेळी उपस्थित होते.