अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
उत्तर प्रदेशात घडलेला घटनेवर महाराष्ट्र बंद करायची महाराष्ट्र सरकारला काय गरज आहे? महाराष्ट्रात दोन वादले झाली पण अजुन शेतकर्याना मदत दीलेली नाही. हे तिन पक्षाचे सरकार नियतीस मान्य नाही. आजचा बंद हा सत्तारूढ़ सरकार ने केलेला बंदचा मी निषेध करतो असं भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे म्हणाले. सत्तेवर असण्यारा पक्ष्यांचे कार्यकर्ते हातात दंडूका घेऊन लोकाना बंद करणेस भाग पाडत आहेत. शेतकऱयांना अजून नुकसान भरपाई दीलेली नाही. त्याचा सरकारनें विचार करावा
महाविकास आघाडीचे सरकारने २०१९ प्रमाणे शेतकऱयांना मदत द्यायला हवी.तसे नकरता हे सरकार नुसते पंचनामे करत फिरत आहे. हे हेतुपूर्वक चालू आहे. अतिवृष्टीमुळे जनतेची शेती ,घरे ८ ते १० दिवस पाण्याखाली होते त्याचे कसे आणि काय पंचनामे करावयाचे असा प्रश्न उपस्थित केला.
अजित पवार हे एक हुषार राजकारणी आहेत.त्यांनी एम पी सी बाबत फसवी घोषणा केली आहे . त्यावर विचारले असता त्या जागा बोर्ड वर आहेत असे सांगितलं जाते.अशीच एखादी फसवी घोषणा वेळ आली तर करावी लागेल असे ते म्हणत आहेत.शेतकऱ्यांबद्दल हे सरकार संवेदनाशील नाही. उत्तर प्रदेशातील घटनेवर महाराष्ट्र बंद ची गरजच काय?सध्या नवरात्रि चे दीवस चालू आहेत आणि ह्यावेळी सरकार ने बंद केला आहे. त्यामुळें जनता नाराज आहे. शेतकरी समाधानी नाही. व्यापारी त्रासला आहे.ह्याचे परीणाम सरकारला लवकरच दीसणार आहेत. ह्या सरकारने केलेल्या बंदचा मी निषेध करतो असं भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.