मलकापूर दि २७ सप्टेंबर
सौजन्यशील व्यक्ती, सहकार्यशिल प्रवृत्ती आणि संवेदनशील मनोवृत्ती असलेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मलकापूर परिसरात मागील अडीच दशकांपासून सदैव तत्परतेने कार्यरत असलेले एक नाव म्हणजे विरसिंहदादा राजपूत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, अशिक्षीत पण सुसंस्कृत माता-पितांचे पुरोगामी संस्कार म्हणून परिस्थितीशी दोन हात करूत उच्च शिक्षण घेतले. तरूणपणा पासुनच स्वतःच्या हिमतीच्या जोरावर, जिद्द आणि चिकाटीने स्वावलंबी बन्याची प्रामाणिक धडपड सुरू ठेवली. त्यातुन आयुष्यात स्थिरता आली, व्यवसाय व सामाजिक ओळख वाढली. काहीतरी वेगळं आणि समाजहितासाठी पोषक ठरेल असे कार्य करावे ही जाणीव मनात पुर्वीपासुच होती. त्यातून जवळपास अकरा वर्षांपूर्वी विरसिंहदादांच्या सामाजिक कार्याला जोड मिळाली ती पत्रकारीतेची. सुरूवातीला सायं दैनिक खबरे शामतकचे उपसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढिल काही वर्षातच आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर स्वतःचे मलकापूर आजतक हे सायं दैनिक सुरू केले. दादांनी आपल्या प्रेमळ, बोलक्या आणि सहकार्यशील स्वभावातुन व संघटण चातुर्याच्या माध्यमातून अल्पावधीतच मलकापूर आजतक या आपल्या सायं दैनिकाच्या वार्ताहरांचे जाळे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पसरविले. प्रत्येक दिवसभरात घडलेल्या घटणा, घडामोडी व सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कार्यक्रम आदींची सविस्तर व इत्यंभूत माहिती आपल्या वाचकां पर्यंत पोहचविण्याची कार्यतत्पराता दादांनी स्वतः लक्षं घालून मलकापूर आजतकच्या माध्यमातून जपलेली आहे. याचबरोबर काळाची पाऊले ओळखून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या सायं दैनिक मलकापूर आजतकला अधिक अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल निर्माण करून आपले वृत्तपत्र देशभर व जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात वसलेल्या मराठी वाचकांना आपल्या परिसरातील बातम्या तात्काळ माहीती करून देण्याची सोय करून घेतली. यात आणखी एक मैलाचा टप्पा आणि मोलाचा प्रयत्न म्हणून मलकापूर आजतकचे युट्युब चॅनल करण्यातही दादांनी उशीर केला नसुन आज मलकापूर आजतकचे एकलाखापेक्षा जास्त फाॅलोअर्स व सस्कायबर्स आहेत. हा सर्व व्याप वाढत असतांना जबाबदारी देखिल वाढत होती. त्यात प्रत्येक वार्ताहर, प्रतिनिधी यांच्या नियुक्त्या करतांना त्यांची पात्रता, अणुभव व सचोटी याच बरोबर पत्रकारीता क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा हेतू, प्रामाणिकपणा आणि नितिमत्ता आदी गुणांची तपासणी स्वतः करून आपल्या नियमात समर्पक वाटलेल्या युवकाला चाचपून घेतले आणि मलकापूर आजतकच्या वार्तांकणाची जबाबदारी दिली. एवढे नाही तर त्यांच्या सर्व बातम्यांची दखल घेऊन त्याच्या परिसरात त्यांचे महत्व आणि मलकापूर आजतकची प्रतिष्ठा वाढविली. हा सर्व व्याप सांभाळत असतांना जिल्हा भरातील विविध वृत्तपत्राचे संपादक, सहसंपादक, वार्ताहर,शहर व तालुक्याचे प्रतिनिधी तसेच प्रिंट मिडीया, डिजिटल मिडीया, पोर्टल न्युज या सर्व प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या लहान-थोर, जुन्या-नव्या कार्यकर्त्याशी सदैव संपर्क ठेवला. समन्वय साधला, सलोख्याचे, सौजन्याचे व सहकार्यांचे संबंध कायम जपले. सोबतच सर्वसामान्य लोक, समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित नागरिक, विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा संघटणा यांच्यासाठी पडेल ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
दादांनी उपद्रवी पत्रकारीतेला जवळ न करता सकारात्मक पत्रकारीता करण्यात सौख्य मानुन प्रशासनातील अधिकारी, व राजकीय पुढारी, नेतेमंडळी आदिंना देखिल आपल्या मलकापूर आजतकची दखल घेण्यास भाग पाडले. एखादी बाब जर चुकिची किंवा कोणावर अन्यायकारक असल्याचे भासत असले तर आपल्या पत्रकारी ज्ञानाचा व अनुभवाचा पुरेपुर कस लाऊन त्याच्या मुळाशी जात सत्य शोधून ते वाचकांसमर आणन्याचे काम दादांनी वेळोवेळी केलेले असल्याने खोटी, चुकिचे व भ्रष्टाचार करणारे अधिकारी व राजकीय पुढारी या सर्वांवर सायं दै मलकापूर आजतकचा दादांनी कायम वचक ठेवलेला आहे.
विरसिंहदादा राजपूत यांच्या व सायं दै. मलकापूर आजतकची आजवरची सर्व वाटचाल, प्रगती व त्यामागची सर्व मेहनत लक्षात घेऊनच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटणेच्या पदाधिकार्यांनी आपल्या संघटणेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दादांकडे देऊन खर्या अर्थाने त्यांच्या कार्याचा व मेहनतीचा गौरव केलेला आहे. दादांच्या पत्रकारीता क्षेत्रातील आजवरच्या प्रवासाचे निरिक्षण केले असता हा विश्वास वाटतो की प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र संघटनेने दिलेली बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी, एक संधी समजुन दादा जिल्हातील सर्व पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी व सपादकांना येणार्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी आवाज बुलंद करतील. म्हणून विरसिंहदादा राजपूत यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा सर्व पत्रकार बांधवाचाच गौरव आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ बुलढाण्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री विरसिंहदादा राजपूत आपणास स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूर तर्फे खूप खूप शुभेच्छा व आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.
(कॅप्शन:- विरसिंहदादा राजपूत यांना शुभेच्छा देतांना स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा डाॅ नितीन भुजबळ व सचिव श्री. विजय पळसकर)