Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धुळे येथे नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची सलग दुसरी मोठी कारवाई.

 

नरेंद्र माळी

दीड कोटी रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर धुळ्यामध्ये शनिवारी जप्त केल्यानंतर याच दिवशी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने रात्री तब्बल चार लाख रुपये किंमतीच्या गांज्यासह तिकूटाच्या मुसक्या आवळल्याने  खळबळ उडाली आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांना मिळालेल्या गुपित माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तिघा संशयीतांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चाळीसगाव रोडवरील हॉटेल देश-विदेश जवळ शनिवारी रात्री काही संशयीत गांज्याची वाहतूक करणार असल्याची माहिती आयजींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. ऑटो रीक्षा (क्रमांक एम.एच.05 बीजी 4318) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात गांजा आढळल्यानंतर रीक्षातील तिघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात मोजणी केल्यानंतर त्याचे वजन 65 किलो भरले. चार लाख 800 रुपये किंमतीचा गांज्याची वाहतूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी मैनोद्दीन शहा सत्तार शहा (29, रा.अजमेरा नगर, धुळे), राहुल बापू कुंवर (29, रा.मोहाडी उपनगर, धुळे), बन्सीलाल रमेश गोसावी (26, रा.शिवम नर्सरीमागे, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.