संग्रामपूर
तालुक्यातील वरवट बकाल येथे दारू पिऊन कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या पित्याच्या त्रासाला कंटाळून पुत्राने साथीदाराच्या मदतीने पित्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासात आरोपी पुत्रास अटक केली असून त्याचा साथीदार फरार झाला आहे. यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास संग्रामपूर रोडवर वरवट बकाल शिवारातील मधुकर बकाल यांच्या शेताजवळ ग्रामस्थांना एका इसमाचे प्रेत आढळून आले. याबाबतची माहिती पोलिस पाटील शुध्दोधन श्रीराम इंगळे यांना मिळताच त्यांनी तामगाव पोलिसांना कळविले.
तामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी वरवट बकाल ग्रामीण रूग्णालयात पाठविला. यानंतर तामगाव पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली असता सदर मृतदेह वरवट बकाल येथीलच संगीत राजाराम इंगळे वय 49 यांचा असून मृतक हा पत्नी, मुलगी व मुलगा विपुल इंगळे यांना दारु पिवुन मारहाण करून त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळुन संशयीत आरोपी विपुल इंगळे याने त्याचे साथीदारासह संगीत इंग्ाळे यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्याचे डाव्या बाजुला कानाचे वर मारुन जिवानीशी ठार केले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने विपुलने साथीदाराच्या मदतीने प्रेत मोटारसायकलवर आणुन वरवट बकाल शिवारात रोडचे कडेला फेकून दिल्याची बाब समोर आली. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून विपुल व त्याच्या साथीदाराविरूध्द कलम 302,201,34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून विपुल संगीत इंगळे याला दुपारी अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार फरार असून वृत्त लिहेपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
दरम्यान मलकापूर डिवायएसपी अभिनव त्यागी यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते असे समजते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीकांत विखे करीत आहेत.