वैजापूर- जे के जाधव महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग वैजापूर व उपजिल्हा रुग्णालय वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने '' मिशन युवा स्वास्थ " अंतर्गत जे के जाधव महाविद्यालय येथे 18 वर्ष वरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड-19 लसीकरण शिबिर घेण्यात आले.यावेळी उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विभागातील डॉ. इंगोले , डॉ. राठी , डॉ. अभंग , श्याम उचित, कावेरी गुंड, वाल्मीक दळवी यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विष्णू भिंगारदेव यांनी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करून जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक भुजाडे , महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कोतकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पंकज साळुंके यांनी केले. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चांगला प्रतिसाद देऊन लसीकरण करून घेतले.