अंगद थोटे
कंधार तालुका प्रतिनिधी 15 सप्टेंबर. कुरूळा सर्कल मधील वहाद येथे आज संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ यौजना शिबिर संपन्न...
लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनता माझी मी जनतेच्या या ब्रिद वाक्यानुसार आज मौजे वहाद येथे खासदार चिखलीकर साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते संभाजी जाधव वहादकर यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच त्यांनी गावातील सर्व निराधार लाभार्थी, वयोवृद्ध लाभार्थी, अपंग लाभार्थी तसेच हजारों निराधारांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून आधार दिला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर पाटील काळे सर यांनी निमार्गदर्शन केले व सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार आणि त्यांना दर महिन्याला याचा लाभ मिळणार असे सांगितले.
याप्रसंगी गावांतील ज्येष्ठ नागरीक, महीला भगिनी तरुण मंडळी उपस्थित होते तसेच नरसिंग मुकनर तंटामुक्ती अध्यक्ष, मुंजाजी मुकनर अध्यक्ष सर्वधर्म समभाव गणेश मंडळ, वैजनाथ जाधव अध्यक्ष सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती वहाद , उध्दवराव मुकनर ,उध्दव तेलंग, प्रकाश मुकनर , नारायण जाधव, शिवशंकर जाधव,हणमंत मुकनर, वाल्मिक जाधव, मधुकर मुकनर , रमेश मोरे, व गावकरी मंडळी आदी उपस्थित होते या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रदीप मुकनर यांनी केले व पिराजी मुकणर यांनी आभार व्यक्त केले.