Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धक्कादायक : जामनेर तालुक्यातून एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले


























पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकाच गावातून एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे दोन भाऊ कुटुंबियांसह १६ वर्षाची आणि दोन १५ वर्षाच्या अशा तीन मुलींसह राहतात. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेच्या सुमारास घरातच्या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुली कुठेच आढळून आल्या नाहीत. रात्री १० वाजता पालकांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत आहे