आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीने साकडे आंदोलन.....
September 12, 2021
भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ सुरेखाताई लुंगारे, उपमहापौर कुसुम ताई शाहू, प्रदेश सदस्य रश्मी ताई नावंदर, राधा ताई कुरील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी गणरायाने ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी इच्छापूर्ती गणेश मंदिर गांधीनगर येथे गणरायाला साकडे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिलांनी महिलाओ के सम्मान में भाजपा मैदान में, ठाकरे सरकारचा निषेध असो, हाय हाय हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय असे नारे दिले. अध्यक्षीय भाषणात श्री किरणभाऊ पातुरकर यांनी महिलांना महिलांच्या सुरक्षितेसाठी आंदोलन करावे लागते हीच खरी शोकांतिका आहे सुप्रियाताई सुळे रूपालीताई चाकणकर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधील महिलांच्या बाबतीत मोठ्या गप्पा मारतात आम्ही महाराष्ट्र मध्ये राहतो महाराष्ट्र विषयी बोला असा खडा सवाल त्यांनी केला . व गणपती विसर्जनाच्या दिवशी या सरकारचे सुद्धा विसर्जन करा असेही ते म्हणाले.याप्रसंगी महामंत्री गजानन देशमुख, राजू मेटे ,राजू कुरील ,सतीश कोरेशिया, प्रदेश सदस्य रश्मी ना बंदर, नगरसेविका राधा कुरील ,अनिता राज, नूतन भुजाडे ,वंदना म डगे ,सविता ठाकरे, सविता भागवत, माला दळवी, बरखा बोचे, अलका सप्रे, सुष्मा कोठेकर, दिव्या डुकरे, ममता चौधरी, शृंगारी सोळंके, संगीता तोंडे, नीता चव्हाण, मंगल खेडकर, सविता निंभोरकर, वंदना लुंगारे, साक्षी यादव ,वर्षा ताय डे, भारती गुहे ,वैशाली आरो कर, शितल देशमुख, स्मिता हरणे, प्रिया साहू, सिया साहू ,भारती गायकवाड, माधव लुंगारे प्रणय लुंगारे सह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.