अरुण कदम कोल्हापुर प्रतिनिधि
दिनांक १३/९/२०२१ राज्यामध्ये गेले आठ ते दहा दिवसापासुन वेगवेगळ्या भागामधे होत असलेल्या संततधार पावसाने झोडपून काढलें आहे. नागरिकाचे हाल होत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात तर जुलैमध्ये झालेल्यां पावसाने शेतकरी व सामान्य नागरीकाचे ही आतोनात नुकसान झालेच्या अजुन आठवनी ताज्या असताना परत पावसाने दमदार हजेरी लावत मुसळधार धारा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापुर मध्यें तर जुलैमध्ये झालेल्यां पावसाने झोडपून काढत असताना हाहाकार उडाला होता हे सर्व ताजे असताना की काय परत एकदा मुसळधार हजेरी लावल्याने प्रशासनानचेही धांदल उडणार आहे. यातच भरीतभर कोयना धरणक्षेत्रात गेल्या दोन तिन दिवसापासुन होत असलेल्या संततधार पावसाने धरण्याची पाण्याची पातळी सतत् वाढत असलेने कोयना धरण्याचे दरवाजे उघडावे लागणार आहे. सध्यां धरणात पाण्याची पातळी १०० टीएमसी असलेने प्रशिसनाने वक्री दरवाजे उघडणेचा निर्णय घेतला आहे.
दरवाजे उघडल्यावर संलग्नक पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकाना सतर्क रहानेचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा नागरिकानी सतर्क राहून काळजी घेण्याचें अवाहन प्रशासनानं केले आहे.