Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ८सप्टेंबरला आंदोलनाचा एल्गार

 चोपडा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांना महाराष्ट्र सरकारने एक जुलै 2020 पासून शासन निर्णयानुसार एप्रिल 2021 पासून दरमहा दोन हजार रुपये आशांसाठी व गटप्रवर्तक त्यांच्यासाठी तीन हजार रुपयाची वाढ दिलेली नाही  व ती दरमहा रेगुलर पगारात लागू केलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे तरी सदर वाढ एकत्रित मानधना बरोबर द्यावी या व इतर मागण्या साठी जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हा परिषद वर 8सप्टेंबरला प्रचंड धरणे आंदोलन करण्या चा ईशारा नोटीस कालोजी चोपडा येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली इत र मागण्या अशा 8मार्च 2021 पासून kovid लसीकरन  होत आहे परंतु मानधन  देण्यात आलेले नाही ते अदा करावेत. आरोग्य वर्धीनी  कामाचे मानधन मिळालेले नाही.. (गोर्गवले प्रा आ केंद्रास मिळालेले नाही.आरोग्या वर्धीनी साठी phc सेंटर ला डॉक्टर पाहिजेत. 

          "माझे कुटुंब माझी जबाबदारी" चे २ राउनड चे मोबदला  मिळालेला नाही.मोबाईल रिचार्ज वाढीव दराने ने मिळावी 100₹रिचार्ज दर😭 परवडत नाहीत साध्या फोनला 150₹व व्हाट्सअप मोबाईल ला 250₹रिचार्ज लागतो. 1जुलै 2019 पासून जाहीर केलेली मानधनवाढ आशा वर्कर दीड हजार रुपये व मदतनीस गटप्रवर्तक दोन हजार रुपये फरकासह  अदा करण्यात यावी. 

      मानव विकास कार्यक्रमात आशांना दिवसभर थांबूनही मोबदला मिळत नाही.तो मिळावा मासिक बैठका प्रमाणे मोबदला मिळावेत मीटिंग अहवालात नवीन कामांचे कोरम नाहीत तो अहवाल फॉर्म दुरस्त करून मिळावा .आशा व गटप्रवर्तक महिलांच्या परिवारातील सर्व कुटुंबाला शासनाने कुरणा विमा कवच द्यावी. अशांना कबूल केल्याप्रमाणे अँड्रॉइड मोबाइल व गटप्रवर्तक यांना लॅपटॉप ध्या.त्यांची कायम निवड होईपर्यंत किंवा 18 हजार रुपये पगार मिळाव.माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी घोषित केल्या प्रमाणे प्रत्येक आशा महिलेस सायकलची रोख रक्कम देण्यात यावी. अशा महिलांना काकांना प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युइटी कायदा लागू करण्यात यावा. कोणताही नवीन सर्व आल्यास त्यासाठी लागणारी सामग्री अगोदर उपलब्ध करून द्यावी आणि त्या कामाच्या मोबदल्यात संदर्भात आदेशाची प्रत द्यावी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात यावी.

     अशा महिलांना वार्षिक एप्रिल हॅन्ड ग्लोज एच वन एन वन मास्क देण्यात यावेत .ज्योती भील चहार्डी आशा यांना ग्रामपंचायतच्या ठरल्याप्रमाणे कामावर घ्या.आदी  मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिनांक 8/9/2021रोजी सकाळी 12 वा वेळेवर जळगाव जिल्हा परिषदेवर आशा गतप्रवर्टक कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल रोजी लेखा अधीक्षक श्री दीपक भावा व उपअधीक्षक श्रीमती रोहिणी ताई यांना दिले यावेळी तालुका अध्यक्ष मीनाक्षी सोनवणे वंदना पाटील सुरेखा कोळी छाया पाटील प्रतिज्ञा पाटील जोशना खंबायत तडवी रेखा पाटील रत्ना शिरसाट उज्वला पाटील शालिनी पाटील या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.