प्रतिनिधी: अवधुत सावंत
पुणे येथील 'महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने' च्या सरचिटणीसपदी 'मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' चे नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव आणि नामदेव शिरगावकर हे चौघे सरचिटणीसपदासाठी इच्छुक होते. परंतु, जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव यांनी माघार घेतली आणि नामदेव शिरगावकर यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली.
गेल्या काही दिवसांपासून सरचिटणीसपदी कोणाची निवड होणार हा राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात चर्चेचा विषय होता. नामदेव शिरगावकर यांच्या बिनविरोध निवडीने या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत शनिवारी अनेक घडामोडी नंतर विविध पदांची निवडणूक बिनविरोध झाली. सरचिटणीसपदासाठी दावेदारी असलेले चंद्रजीत जाधव आणि धनंजय भोसले यांच्यात कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कोषाध्यक्ष या एकमेव पदासाठी निवडणूक होणार आहे. अन्य पदांवर बिनविरोध निवड झालेली आहे.
गेली अनेक वर्षापासून सरचिटणीसपदी असणारे बाळासाहेब लांडगे यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला नवा सरचिटणीस लाभणार हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष - उपमुख्यमंत्री अजित पवार (महाराष्ट्र कबड्डी संघटना),
वरिष्ठ उपाध्यक्ष - बाळासाहेब लांडगे (महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना),
उपाध्यक्ष (चार पदे)
संजय शेटे (महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना),
जय कवळी (महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना),
प्रदीप गंधे (महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना),
अशोक पंडीत (महाराष्ट्र रायफल संघटना),
सचिव - नामदेव शिरगावकर (मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
सहसचिव (चार पदे)
प्रशांत देशपांडे (महाराष्ट्र आर्चरी संघटना),
सुंदर अय्यर (महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना),
प्रकाश तुळपुळे (महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना),
दयानंद कुमार (महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना)
कार्यकारी सभासद (नऊ पदे) : दीपक मेजारी (स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
संदीप चौधरी (रम्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
नीलेश जगताप (महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशन),
अमेय छाजेड (महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना),
सोपान कटके (ऑल महाराष्ट्र वुशू संघटना),
राजाराम राऊत (हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
गोविंद मुथ्थुकुमार (महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना),
उदय डोंगरे (महाराष्ट्र तलवारबाजी संघटना), स्मिता यादव (महाराष्ट्र रोइंग संघटना)