Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रस्ता बंद, उपचारासाठी पतीने पत्नीला खांद्यावर उचलले, पण...!

नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद असल्याने एका पतीने आपल्या गंभीर स्थितीत असलेल्या पत्नीला खांद्यावर उचलून रस्ता पार केला. मात्र वेळेत दवाखान्यात न पोहचू शकल्याने तिचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली.
नंदुरबारमधील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला नाही. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली होती. या रुग्णवाहिकेतील सिदलीबाई पाडवी ही महिलेच्या पोटात तिव्र वेदना होत होत्या. रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते मात्र, रस्ताच बंद असल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली. रस्ता बंद असल्याने उपचारासाठी येत असलेल्या सिदलीबाई पाडवी यांना पतीने खांद्यावर घेत दवाखान्यात पायवाटेने निघाले. परंतू सिदलीबाईचा रस्त्यातच दुर्देवी अंत झाला आहे. या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू झाला